कणकवलीतील नाथ पै नगर येथील रस्ता कामाला प्रारंभ ;नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची उपस्थिती

कणकवलीतील नाथ पै नगर येथील रस्ता कामाला प्रारंभ ;नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची उपस्थिती

*कोकण  Express*

*कणकवलीतील नाथ पै नगर येथील रस्ता कामाला प्रारंभ ;नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची उपस्थिती…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला रस्ता ते भवानी अपार्टमेंट या दरम्‍यानच्या रस्ता कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. ज्‍येष्‍ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, सखाराम सकपाळ आणि श्री.महाजन यांनी नारळ वाढवला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील भवानी अपार्टमेंट ते गेटवेल हॉस्पीटल, भूमी अभिलेख कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणे मुश्‍कील झाले होते. मात्र आता या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण होणार आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, सौ.महाजन, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, प्रशांत सावंत, सुशील पारकर, आनंद पारकर, अण्णा कोदे, महेश सावंत, नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, ठेकेदार ए पी सावंत, वैभव मेस्त्री, बाळा पाटील, अजय घाडी, सुशील दळवी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!