*कोकण Express*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
कसई- दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीतून ३६ सही उमेदवारांंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवल्याचे चित्र आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाहायला मिळाले. १३ जागांसाठी ३६ जण रिंगणात उतरले होते. त्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आता १३ जागांसाठी ३६ जण निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे.
या ३६ उमेदवरांत राष्ट्रवादी- शिवसेनेचे १३ तर भाजप १२, काँग्रेस ६ व अपक्ष ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा लीना कुबल, भाजपच्या माजी शहर अध्यक्ष दीपिका नाईक व भाजपा विद्यमान महिला शहर अध्यक्ष व उमेदवार रेश्मा कोरगावकर यांचे दिर प्रकाश कोरगावकर यांनी पक्षाशी केलेली बंडखोरी पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी घातक ठरणार आहे.