*कोकण Express*
*देवगडात 13 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात*
देवगड – जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीतून आज चार उमेदवारांनी आपली उमेदवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतली आहे. यामध्ये दोन अपक्ष, एक राष्ट्रीय काँग्रेस व एक भाजपच्या समावेश आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत 17 प्रभागांसाठी होत असून ओबीसी आरक्षणाचा फटका 4 प्रभागांना पडला असल्याने 13 प्रभागासाठी आता ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता 13 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकाच उमेदवारांचे दोन अर्ज असल्याने 41 नामनिर्देशनपत्रे असून 40 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मागे घेतलेल्या अर्जामधून प्रभाग 9 मधून भाजपच्या मिलिंद माने व राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कदम यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तर प्रभाग 12 मधून परीमल नलावडे याने तर प्रभाग 2 मधून सुधीर तांबे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे . राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरेश कदम यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजप व शिवसेना यामध्ये दुरंगी लढत होणार आहे. तर प्रभाग 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युती असली तरी या प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत मध्ये होणार आहे .

