३७ उमेदवारांमध्ये रंगणार वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुक

३७ उमेदवारांमध्ये रंगणार वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुक

*कोकण  Express*

*३७ उमेदवारांमध्ये रंगणार वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुक*

*दोन अपक्ष उमेदवारांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार*

*प्रभाग क्रमांक २,६,९,११,१३,१४,१७ मध्ये दुरंगी तर १,१०,१२ तिरंगी ४,७ मध्ये चौरंगी आणि प्रभाग क्रमांक ८ मध्ये बहुरंगी होणार निवडणूक*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत छाननीनंतर ५० पैकी ११ उमेदवार अपात्र ठरले होते. त्यामुळे १३ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आता एकूण ३७ उमेदवारांमध्ये ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

प्रभाग निहाय लढत होणारे उमेदवार पुढील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक 1 – स्नेहलता सदाशिव चोरगे- भाजपा, श्रद्धा रोहित रावराणे- शिवसेना, मीना नामदेव बोडके- राष्ट्रीय काँग्रेस,

प्रभाग क्रमांक 2 – नेहा दीपक माईणकर- भाजपा, रेखा सुरेश निकम- शिवसेना,

प्रभाग क्रमांक 4 – प्रिया भानुदास तावडे- भाजपा, अक्षता अरुण जैतापकर- अपक्ष, सुलोचना रोहिदास पवार- राष्ट्रवादी काँग्रेस, सुनिता रवींद्र चव्हाण- शिवसेना,

प्रभाग क्रमांक 6- राजन वसंत तांबे- भाजपा, रवींद्र श्रीधर तांबे- शिवसेना,

प्रभाग क्रमांक 7 – भालचंद्र मारुती रावराणे- भाजपा, प्रदीप प्रकाश रावराणे- शिवसेना, सचिन तावडे- मनसे, चित्रसेन धर्माजी होळकर- राष्ट्रवादी काँग्रेस,

प्रभाग क्रमांक 8 – मंगेश विठोबा नाधवडेकर- राष्ट्रीय काँग्रेस, रवींद्र गुलाबराव चव्हाण- राष्ट्रवादी काँग्रेस, संताजी अरविंद रावराणे- अपक्ष, रोहन जयेंद्र रावराणे- अपक्ष, तुषार मोहन चिले- मनसे, संजय सखाराम चव्हाण- शिवसेना,

प्रभाग क्रमांक 9 – तन्वी शरद तांबे- शिवसेना, सुप्रिया राजन तांबे- भाजपा,

प्रभाग क्रमांक 10 – सुंदरी रामचंद्र निकम- भाजपा, दीपक सदाशिव गजोबार- शिवसेना, यशवंत वासुदेव प्रभुलकर- काँग्रेस,

प्रभाग क्रमांक 11- यामिनी यशवंत वळवी- भाजपा, जयश्री विश्वनाथ बहीरम- शिवसेना,

प्रभाग क्रमांक 12 – प्रथमेश यशवंत रावराणे- शिवसेना, विवेक सज्जन रावराणे- भाजपा, सुधाकर बळवंत रावराणे- काँग्रेस,

प्रभाग क्रमांक 13 – शिवाजी सखाराम राणे- शिवसेना, संजय दिगंबर सावंत- भाजपा,

प्रभाग क्रमांक 14 – दर्शना संतोष पवार- शिवसेना, श्रावणी श्रीकांत तांबे- भाजपा,

प्रभाग क्रमांक 17 – सानिका सुनील रावराणे- शिवसेना, सानिका समाधान रावराणे- भाजपा.

नगरपंचायतीच्या २७ जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसीच्या चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण १२ उमेदवार, सेनेकडून १३, राष्ट्रीय काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३, अपक्ष ३, मनसे २ असे एकूण ३७ उमेदवार अखेर वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!