*कोकण Express*
*हेदुळ येथील रस्ता अडविणे पडले महागात…*
*…त्या खाणं मालकाचा जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना केला रद्द*
*जि प अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हेदुळ सडावाडी धनगर वस्तीत जाणारा 20 वर्षापूर्वीचा रस्ता जिल्हा परिषद मालकीचा रस्ता स्वमालकीचा असल्याचे सांगत सडावाडी येथील धनगर वस्तीवर जाणारा रस्ता अडविणाऱ्या खाण मालकाचा परवाना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी रद्द केला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली.
जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यावर स्व हकक गाजवत व तो रस्ता उखडून टाकत चिरेखाण व्यवसाय सुरू करणाऱ्या चिरेखाण मालक पालकर यांनी बळजबरीने तेथील ग्रामस्थांचा रस्ता अडविला होता. याबाबत तेथील ग्रामस्थ व मालवण पंचायत समिती गटनेते अनिल घाडीगावकर यांनी या प्रश्नाविषयी जिप अध्यक्ष संजना सावंत यांची भेट घेत सदरील रस्ता हा जि प मालकीचा असल्याने तू त्वरित सुरू करा अशी मागणी केली होती मात्र सदरील जागा ही आपण पाच वर्षापूर्वी खरेदी केली असून या रस्त्याची नोंद ओवळीये ग्रामपंचायत व हेदुळ ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याने हा रस्ता अनधिकृत असल्याचे सांगत सदा वाडी धनगर वस्ती वर जाणारा रस्ता अडविण्याचा प्रकार देखील खाणमालक यांनी केला होता. मात्र याबाबत चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी कुडाळ मालवण प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना दिले होते तर आज प्रांताधिकारी खरमाळे यांच्या चौकशी अहवालानंतर हेदुळ येथील त्या खाण व्यावसायिकाचा परवाना रद्द केला असल्याची माहिती जिप अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली.