*कोकण Express*
*मालवण आगारातून पहिली बस ओरोसला रवाना…*
एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असताना ३४ दिवसानंतर येथील आगारातून आज सकाळी ९. ४५ वाजता मालवण कट्टा ओरोस ही बसफेरी सोडण्यात आली अशी माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.
दुपारी १ वाजता मालवण कसाल, ओरोस ही गाडी सोडण्यात येणार आहे. उद्यापासून सकाळी ९. ०५ वाजता ओरोस बस सुटणार असल्याची माहिती श्री. बोवलेकर यांनी दिली.
यावेळी उदय खरात, अमोल कामते, प्रसाद बांदेकर, ए. जी. वाघमारे, जी. वाय. गोळवणकर, एसटी चालक ए. जे. भोगवेकर, वाहक एम. एन. आंबेसकर आदी उपस्थित होते.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हा असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार येथील आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. इतरही कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे असे आवाहन आगारप्रमुख श्री. बोवलेकर यांनी केले आहे.