…..त्या वादातून वाचवण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडतेच होते पाठीशी

…..त्या वादातून वाचवण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडतेच होते पाठीशी

*कोकण Express*

*…..त्या वादातून वाचवण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडतेच होते पाठीशी..*

*शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांचा भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणेंनवर पलटवार..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

 सांगिर्डेतील ग्रामस्थांशी काही वर्षापूर्वी तुमचा वाद झाला होता, त्यावेळी तुम्हाला वाचवण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेच तूमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, हे विसरू नका, असा पलटवार कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्यावर केला आहे.

कुडाळ ग्रामपंचायत उपसरपंच ते नगराध्यक्ष पदापर्यंतचे तुमचे सगळे कार्य आम्हाला माहित आहेत. व येथील जनतेने पाहीले देखील आहे. त्यामुळे आपले सह्यांचे राजकारण उघड करण्यास आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

श्री. राणे यांनी काल शिवसेनेचे नेते श्री. संजय पडते आणि सतीश सावंत यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री.नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, आमदार वैभव नाईक हे जनतेच्या मनावर राज्य करणारे आमदार आहेत. ते सर्व जनतेसाठी रस्त्यावर उतरून कामे करतात. त्यांना जनतेने दोन वेळा मोठ्या मताने स्विकारले आहे. यापुढेही असेच स्विकारतील. श्री. नाईक यांनीच खासदार विनायक राऊत आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या साथीने खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गात विकासगंगा आणली. म्हणूनच सलग दुसऱ्यांदा त्यांना जनतेने स्विकारले आहे. तर नितेश राणेंना पुढच्या निवडणूकीत घरी बसवण्याची तयारी श्री. पडते यांच्या नेतृत्वाखाली श्री. सावंत करीत आहेत. त्याची काळजी तुम्ही आतापासून करा, असे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकही श्री. सावंत यांच्या नेतृत्वाखालीच राहील. आपण त्याची चिंता करु नये, आपण आपले नगरपंचायतीतील अस्तित्व टिकवण्यासाठी
प्रयन्त करावेत, असे श्री.नाईक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!