*कोकण Express*
*पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने विशेष सन्मान*
*कासार्डे ः संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक कलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
१० डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची व भरीव योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने यावर्षीच्या सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती.
१० डिसेंबर या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून पद्मश्री पुरस्कार विजेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलेचा उपासक असलेले तसेच लोककला जीवंत ठेवण्यासाठी विशेष योगदान देणारे परशुराम गंगावणे यांचा संघटनेच्यावतीने शाल व श्रीफळ तसेच सन्मानपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले.या विशेष सन्मानाबद्दल परशुराम गंगावणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पिरखान, उपाध्यक्ष प्रकाश नारकर, सदस्य मनोज वारे, प्रवीण गायकवाड, मालवण तालुका खजिनदार रितेश सावंत, कुडाळ तालुका सदस्य विजय गावडे उपस्थित होते.

