*कोकण Express*
*शिरशिंगे दलित वस्तीतील प्रलंबित विकास कामे व समस्यांंची पहाणी*
*समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची अधिकारी यांच्यासमवेत भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिरशिंगे दलित वस्तीतील प्रलंबित विकास कामे आणि समस्या जाणून घेण्यासाठी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी ग्रामपंचायत आणि दलित वस्तीला अधिकारी यांच्यासमवेत भेट दिली. सभापती जाधव यांच्या अचानक दौऱ्या मुळे सावंतवाडी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. जाधव यांनी विकास कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करा असे आदेश ग्रामसेवक राऊळ यांना केले.
शिरशिंगे येथील मुंबई स्थित विकास मंडळाचे अध्यक्ष यशवंत परब यांनी सभापती जाधव यांना गावात दौरा करून विकास कामे आणि ग्रामस्थ यांच्या समस्या जाणून घ्या अशी विनंती केली होती. त्यानुसार सभापती जाधव यांनी शिरशिंगे येथे ग्रामपंचायत ला भेट दिली. ग्रामसेवक राऊळ यांच्या कडून दलित वस्तीची सविस्तर माहिती घेतली. त्याच प्रमाणे दलित वस्तीतील ग्रामस्थांनी विकास कामे व समस्या चर्चेतून उपस्थित केल्या. प्रामुख्याने समाजमंदिर, विहीर दुरुस्ती, रस्ता नूतनीकरण, स्टेज आणि मंडप, नवीन घरकुल, घरदुरुस्ती आदी प्रश्न मांडले. या विकास कामांचे लेखाशीर्षक निहाय प्रस्ताव जी. प. सादर करा. आवश्यक असेल तिथे ग्रामपंचायत चा निधी खर्च करा असे आदेश सभापती जाधव यांनी विस्तार अधिकारी लोंढे व ग्रामसेवक राऊळ यांना दिले
. त्यानंतर जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समवेत दलितवस्तीला भेट दिली. नादुरुस्त समाजमंदिर, विहीर, रस्ता आदीची पाहणी करण्यात आली.
यावेळी सभापती जाधव यांच्या समवेत विस्तार अधिकारी लोंढे, ग्रामसेवक राऊळ यशवंत परब, मधुकर देसाई, आत्माराम गावडे, संजय नाईक, श्री राऊळ, श्री राणे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.