*कोकण Express*
*कै.अनिल शिवराम राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “हळवल येथे शिल्पाज् क्रिकेट ॲकॅडमी स्थापन”*
*ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाडू क्षेत्रातील व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट*
*ॲकॅडमीच्या माध्यमातून खेळाडू निर्माण करण्याचे विशेष प्रयत्न; सचिन सदाशिव सावंत यांचे गौरवोद्गार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज हळवल गावी अनिल शिवराम राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शिल्पाज् क्रिकेट ॲकॅडमी” चा उद्घाटन सोहळा पार पडला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी गावातील खेळाडूंच्या समस्यांचा विचार करून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
खास गोष्ट म्हणजे खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून राजू कासले हे मार्गदर्शक तथा ट्रेनर म्हणून लाभले आहेत आणि याचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच होणार असल्याचा विश्वासही यावेळी उपस्थितांनी तसेच ‘शिल्पाज् ॲकॅडमीच्या सहकाऱ्यांनी दिला.
सचिन सदाशिव सावंत यांनी हळवल गावात शिल्पाज् ॲकॅडमी स्थापन करण्याचे विशेष प्रयत्न केले आहेत. याबद्दल गावातील ग्रामस्थांनी सचिन सदाशिव सावंत यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानले व पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ तसेच शिल्पाज् ॲकॅडमी चे मार्गदर्शक व सहकारी उपस्थित होते.

