सावंतवाडीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सावंतवाडीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

*कोकण Express*

*सावंतवाडीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…*

*पक्ष संघटना मजबूत करून पवारांचे हात बळकट करा; अमित सामंतांचे आवाहन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आज जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे सुपुत्र भुवन याच्या हस्ते केक कापण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान पक्ष संघटना मजबूत करून शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.सामंत यांनी केले.
तालुकाध्यक्ष श्री.दळवी यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, पक्ष निरक्षीक स्नेहल मठपती, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे,भास्कर परब,रूपेश जाधव, प्रफुल्ल सुद्रीक, अफरोज राजगुरू, देवेंद्र टेंमकर, शफिक खान,संतोष चिंदरकर, दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर,हिदायतुल्ला खान, समीर आचरेकर, देवेंद्र पिळणकर, राजेश पाताडे, बावतीस फर्नांडिस, याकुब शेख, नियाज शेख,सिद्धेश तेंडुलकर,आसिफ ख्वाजा,जहिरा ख्वाजा,संदीप राणे,अगस्तिन फर्नांडिस,नवल साटेलकर,इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल,शैलेश लाड, प्रसाद दळवी, प्रथमेश चोडणकर, कौस्तुभ नाईक, मयुरेश मुळीक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!