*कोकण Express*
*राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल मार्गदर्शन*
*शरद पवार करणार कार्यकर्त्यांना संबोधित*
*राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्याकडून आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून शरद पवार यांचे मार्गदर्शन पर भाषण ११ वा पासून भाषण चालू होणार आहे. त्याचे लाइव्ह व्हरचयुअल प्रक्षेपण यु ट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रमधे प्रसारित होणार आहे. त्यासाठी कणकवली शहर व तालुका राष्ट्रवादी तर्फे पवार यांचे मार्गदर्शन कणकवली शहरातील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथे लाईव्ह दाखविण्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी केले आहे.
त्याचबरोबर वाढदिवसानिमीत्त गेली १२ वर्ष जानवली नदीवर बांधण्यात येणार पाणी साठवनुकिचा बंधारा बांधण्यात येणार आहे. या वेळी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.