नांदगाव येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून शिलाई मशिन वाटप

नांदगाव येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून शिलाई मशिन वाटप

*कोकण Express*

*नांदगाव येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून शिलाई मशिन वाटप*

*विविध प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या व विमान प्राधिकरण यांच्यावतीने व नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव च्या सहकार्याने नांदगाव येथील 10 महीलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आले .

सदर महीलांनी एकत्र व्यवसाय करून आपला व्यवासाय निर्माण करायचा आहे .तसेच यावेळी जनशिक्षण संस्थान सिंधुदूर्ग तर्फे नांदगाव येथे अगरबत्ती,शिवणकला ,फळ प्रक्रीया आदी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले .तसेच केंद्र सरकार मान्यता प्राप्त नागरीक सुविधा केंद्र या कॉमन सर्व्हीस सेंटरचे उद्घाटन यावेळी करण्यात आले .

यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,जनशिक्षण कार्यक्रम अधिकारी रमेश खरात ,राजन मोरजकर ,ऋषिकेश मोरजकर ,भाई मोरजकर ,दिपक मोरजकर ,ग्रामपंचायत सदस्या सौ.ईशा बिडये , सौ.वृषाली मोरजकर ,सौ.रश्मी मोरजकर ,मयुरी मोरये ,आदी महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होता.

यावेळी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी माजी मंत्री सुरेश प्रभु व नांदगाव येथे किशोर मोरजकर ट्रस्ट या परिवर्तन केंद्राचे कौतूक करून सदर महीलांनी योग्य प्रकारे व्यवासाय उभारून मोठे उद्यासेजक बना असे आवाहन उपस्थीत महीलांना केले.तसेच जनशिक्षण चे रमेश खरात यांनी ही उपस्थीतांना मार्गदर्शन करीत विविध प्रशिक्षण व शिलाई मशिन संदर्भात मार्गदर्शन केले . माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व विमानप्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू शिवणकाम करणा-या महिलांसाठी शिलाई मशीन वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोना पार्श्वभूमीवर एकत्र येणे शक्य नव्हते म्हणून त्या त्या परिवर्तन केंद्रामार्फत सदर शिलाई मशीन वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कणकवली तालुक्यातील निवडण्यात आले आहे . कणकवली तालुक्यात 12 परिवर्तन केंद्र असून 120 मशिन वितरण करण्यात आले आहेत. यात नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टही सुरेश प्रभू यांच्या जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या परिवर्तन केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे . यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर व आभार भाई मोरजकर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!