*कोकण Express*
*सिंधुदुर्गात होप एक्सप्रेसचा शुभारंभ*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली व डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सव्र्हिस सेक्रेटरी डॉ.लेनि डिकॉस्टा मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग-गोवा भागातील गरजू लोकांसाठी, विविध स्थानिक रोटरी क्लबच्या पुढाकाराने, होप एक्सप्रेसद्वारे दि.९ ते २३ डिसेंबर कालावधीत कॅन्सर मुक्तीसाठी मोफत रोग निदान-तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ देवगड-जामसंडे येथे करण्यात आला.
यावेळी उद्घाटक माजी प्रांतपाल विनयकुमार पै-रायकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरीयन राजेश साळगांवकर, अजय मेनन, होप एक्सप्रेस समन्वयक सचिन मेणसे, असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ , असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, आयोजक रोटरी मँगोसिटी देवगड क्लब प्रेसिडेंट हनिफ मेमन, सेक्रेटरी संजय धुरी, पास्ट प्रेसिडेंट डॉ.के.एन.बोरफळकर, कणकवली प्रेसिडेंट डॉ.विद्याधर तायशेटे, कुडाळचे प्रेसिडेंट अभिषेक माने, आरडीसी प्रणय तेली, कोल्हापूर कॅन्सर सेंटर होप एक्सप्रेस टीमच्या प्रमुख डॉ. वैशाली शिरोडकर आणि तंत्रज्ञ टिम आयोजक मँगोसिटी देवगडची रोटरी क्लब टीम उपस्थित होते.
होप एक्सप्रेस १२ रोजी वेंगुर्ला, १३-कणकवली, १४-पेडणे, १५-म्हापसा, १६-बिचोलीम, १७-म्हापसा इलाइट, १८-पणजी मिरामार, १९-फोंडा, २०-मडगांव, २१-मडगाव सनराइज, २२-वास्को, २३-कुंकळ्ळी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.