*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या निवडणूक रणनीतीची भाजपाकडून दखल*
*गोवा विधानसभा निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आमदार नितेश राणे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत किंगमेकर ठरलेले युवा नेते आणि भाजपा आमदार नितेश राणे यांची निवड गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारात भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र विरोधी पक्षनेते व गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांसोबत या निमित्ताने काम करण्याची संधी आमदार नितेश राणे यांना मिळाली आहे.
आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाच्या विजयासाठी जो निवडणूक कार्यक्रम राबवितात आणि खात्रीपूर्वक विजय मिळवितात या त्याच्या निवडणूक रननीतीची दाखल विरोधीपक्ष नेते आणि गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आपल्या टीम मध्ये आमदार नितेश राणे यांचा समावेश केला आहे.