*कोकण Express*
*भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती पत्र रुपाने सिंधुदूर्गात!!!!*
*तळेरेतील निकेत पावसकर यांना पाठवलेल्या त्या पत्राने जागवल्या लष्कर प्रमुखांच्या आठवणी*
*कासार्डे संजय भोसले*
लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला असला आणि ते अनंतात विलीन झाले असले तरी त्यांच्या स्मृती त्यांच्या स्वहस्ताक्षरात कणकवली तालुक्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्याकडे जिवंत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकेत पावस्कर हे संदेश पत्र संग्राहक व “अक्षरोत्सव “या अभिनव संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जातात .त्यांना लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पत्र पाठवले होते ,त्यांच्या या पत्र रुपी स्मृति सिंधुदुर्गात म्हणजे निकेत पावसकर यांचेकडे कायमस्वरूपी राहिल्या आहेत.