*कोकण Express*
*नाटळ हायस्कूल व जि प शाळा दारिस्ते नं १ येथे जि प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप*
*युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांचा स्तुत्य उपक्रम*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने आज *शुक्रवार दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी मा सौ संजना संदेश सावंत ,जि प. अध्यक्ष सिंधुदुर्ग* यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप कार्यक्रम नाटळ हायस्कूल व जि प शाळा दारिस्ते नं १ येथे करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार,
युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते .जिल्हयाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व जिल्ह्यातील विद्यार्थी UPSC, MPSC सारख्या परीक्षेत चमकली पाहिजेत यासाठी प्रतिष्ठान नेहमीच स्पर्धा परीक्षा व अन्य उपक्रम मोफत राबवित असतात.
सर्वांनी याचा फायदा करून घेवा कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधावा आपण नेहमी मदतीसाठी तयार असल्याचे अध्यक्षांनी मनोगतात अभिवचन दिले.
यावेळी नाटळ हायस्कूलचे चेअरमन श्री भालचंद्र सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज,दारिस्ते सरपंच संजय सावंत, नाटळ हायस्कूल मुख्याध्यापक श्री सी टी तांबे, नाटळ उपसरपंच दत्तू खरात ,दारिस्ते उपसरपंच सिताराम गुरव आदि मान्यवर उपस्थित होते.