*कोकण Express*
*सिंधुदुर्ग किल्ला पर्यटनासाठी खुला….*
*जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी_*
*मालवण ः प्रतिनिधी*
कोरोनामुळे देशात लॉक डाऊन केल्याने सगळे व्यवसाय बंद होते. त्याचबरोबर सर्व पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात आली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक देखील बंद होती.
परंतु तब्बल २३५ दिवसांनी अटी आणि शर्ती घालून जिल्हाधिकारी यांनी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली आहे.