*कोकण Express*
*वैभववाडी न.पं. निवडणूक प्रचाराचा भाजपाने केला शुभारंभ*
*कार्यकर्त्यांची शहरात घोषणाबाजी*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भाजपाच्यावतीने पार पाडला. यावेळी शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. येथील दत्त मंदिरात नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती बाळा हरयाण, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, राजू पवार, हर्षदा हरयाण, सीमाताई नानिवडेकर, प्रकाश पाटील, किशोर दळवी, रितेश सुतार, श्री. मसुरकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपाचे अधिकृत उमेदवार स्नेहलता चोरगे, नेहा माईनकर, प्राची तावडे, राजन तांबे, भालचंद्र रावराणे, सुप्रिया तांबे, सुंदरी निकम, विवेक रावराणे, संजय सावंत, श्रावणी तांबे, यामिनी वळवी, सानिका रावराणे, अपक्ष उमेदवार संताजी रावराणे, रोहन रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी नासीर काझी म्हणाले, वैभववाडी न.पं. वर भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा बाजी मारणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.