*कोकण Express*
*७०-८० रक्तदात्यांनी केले रक्तदान..*
*सामाजिक कार्यकर्ते रविकांत राऊळ यांचा सामाजिक उपक्रम..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
“रक्तदान म्हणजेच जीवनदान” “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून गेली १३ वर्षे
सामाजिक कार्यकर्ते श्री.रविकांत राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री.प्रकाश मोर्ये व रविकांत राऊळ मित्र मंडळ यांच्याकडून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान केले.तसेच रविकांत राऊळ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी माजी सभापती मोहन सावंत,माजी उपसभापती दिपक नारकर,सरपंच सुरज कदम,वनपाल कर्मचारी,बाळा सुद्रीक,दिपक खरात,प्रसाद मोर्यै,भरत सावंत,आबा निचम,दिलीप राऊळ, आदी मित्रमंडळी उपस्थित होते.