*कोकण Express*
*जिल्हापरिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी राजेश जाधव यांची वर्णी*
*कासार्डे ः संजय भोसले*
आपल्या निवडीवर समाधान व्यक्त करताना राजेश जाधव म्हणाले की , आगामी काळात शाळा व शालेय विद्यार्थ्यांच्या हिताची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यास कटीबद्ध आहे. ही अनमोल संधी मला प्रदान केल्याबद्दल मी व्यक्तिशः शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. शशांक तळेकर व श्री. दिलीप तळेकर, सर्व तळेरे ग्रामस्थ, सर्व पालकवर्ग, सर्व शिक्षक वर्ग व माझे सर्व सहकारी मित्र यांचा मी शतशः ऋणी आहे. या संधीचे सोने करून जिल्हा परिषद आदर्श शाळा तळेरे नं. १ ची आदर्श परंपरा अबाधित ठेवून प्रगतीचा आलेख उंचावलेला आहे तो तसाच आबाधित राखण्यासाठी मी प्रयत्नशील, कार्यशील व कटिबद्ध असणार आहे. पुनःश्च सर्वांगीण सहकार्याच्या अपेक्षेसह सर्वांचे मनःपूर्वक आभार!

