*कोकण Express*
*वर्तमान पत्रावर उपलब्ध साहीत्याद्वारे अक्षय मेस्रीने कलाकृती सादर करुन बीपीन रावत यांना वाहीली अनोखी श्रद्धांजली*
*हा देश आपल्या सेवेबद्दल कायम कृतज्ञ राहील!*
*कासार्डे ः संजय भोसले*
डोकलाम प्रकरणी भूतानमध्ये भारतीय सैन्य घुसवून चीनला मागे जाण्यास भाग पाडणारे.. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचं थोबाड फोडणारे, लद्दाकमध्ये चीनला जशास तसं उत्तर देणारे आणि आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे भारताचे संरक्षण दल प्रमुख सुपुत्र जनरल बिपिनजी रावत यांचे अपघाती दुःखद निधन हे मनाला चटका लावुन जाणारे ठरले.त्यांना व त्यांच्या सोबत अपघातात मृत्यू पावलेल्या सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
आपल्या राष्ट्रसेवेला त्रिवार वंदन…..
अगदी ग्रामीण भाग असल्याने श्रध्दांजली वाहण्यासाठी वर्तमान पेपरवर जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याद्वारे अक्षय मेस्रीने आपली कला सादर केली आहे.
ग्रामिण भागात जास्त कॅनव्हास, पेपर कलर उपलब्ध होत नाही अर्थातच ग्रामिण भागातले विद्यार्थी कलेकडे दुर्लक्ष करतात पण अक्षयने आपली कला जिवापाड जपल्याचेच या वरून सिद्ध होते.

