*कोकण Express*
*कसाल हुंबरणेवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामासाठी आठ लाख रु. निधी मंजूर*
*समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या प्रयत्नातून मंजूर*
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग विभागा अंतर्गत जनसुविधा मधून कसाल हुंबरणेवाडी येथील रस्ता डांबरीकरणे या कामासाठी आठ लाख रु. निधी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.या रस्ता विकास कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून सभापती जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले.
भूमिपूजन प्रसंगी कसाल सरपंच संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, ग्रामपंचायत सदस्य अनिता परब, ग्रामसेवका शालिनी कोकरे, बापू पाताडे,मदन परब, यशवंत परब,मोहन परब,भालचंद्र बागवे,संदीप राणे,रामराव परब,अनिल परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजकल्याण सभापती जाधव यांच्या प्रयत्नातून आणि ग्रामपंचायत च्या सहकार्य यामुळे हुंबरणे वाडीसाठी रस्त्यासाठी जनसुविधा मधून आठ लाख रुपये मंजूर झाले. जाधव हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत.त्यामुळे जिल्हा नियोजन समिती मधून विशेष निधी त्यांनी केलेल्या शिफारस यामुळे मंजूर केला जातो.उपस्थित सरपंच परब, उपसरपंच सावंत आणि ग्रामस्थ यांनी जाधव याचे आभार प्रकट केले.