*कोकण Express*
*फोंडाघाट येथील पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कासार्डेचा कैलास पवार अव्वल*
*स्वप्नाली कदम हीने पाॅवर लिप्टींन मध्ये द्वितीय व दोरी उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला *
*कासार्डे ः संजय भोसले*
फ्युचर फिट जिम फोंडाघाट आयोजित पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कासार्डे येथील वैभव मुद्राळे हेल्थ झोनचा कैलास पवार व कु. स्वप्नाली कदम यांनी यश संपादन केले. कैलास पवार या खेळाडूने ज्युनिअर पॉवर लिफ्टींग या गटात 385 kg वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुलींमध्ये कु. स्वप्नाली कदम हिने ज्युनिअर पॉवर लिफ्टींग या गटात 180 kg वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कु. स्वप्नाली हिने दोरी उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. विजेत्यांना टीम वैभव यांच्या वतीने जिममध्ये गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्ती आर्मी ऑफिसर रवींद्र पाताडे, शाशंक तळेकर, शिक्षक राजीव बिरादार तसेच जिम मधील सर्व व्यायामपटू उपस्थित होते. सर्व खेळाडूंना व्यायाम शाळेचे संचालक वैभव मुद्राळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राजीव बिरादार यांनी केले. त्यावेळी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.