*कोकण Express*
*श्री बांदेश्वर मंदिराचा दिपोत्सव उत्साहात!*
*बांदा ः प्रतिनिधी*
बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
प्रतिवर्षी देवदीपावलीलाहा दिपोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यात भाविकांना मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री बांदेश्वर भुमिका मंदिर परिसर या हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला होता.
रविवार देवदीपावलीच्या दिवशी सायंकाळी या दिपोत्सवाचे उद्घाटन मंदिरातील पुराण वाचन कार्यक्रमाचे नियमित सदस्य चंद्रकांत मोर्ये, श्री बांदेश्वराचे सेवेकरी भक्त तथा बांदा येथिल व्यापारी विवेक विरनोडकर, श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान समितीचे सेक्रेटरी सावळाराम सावंत आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर, सगुण सावंत, लक्ष्मी सावंत, सुरेश सावंत, धोंडू पणशीकर, मोहन सावंत , शरद सावंत ,प्रकाश प्रभु यांचेसह अनेक मान्यवर, महिलावर्गासह श्री बांदेश्वर भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी केले. देवस्थानतर्फे दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी एका दिव्यासाठी अकरा रुपये अर्पणमुल्य ठेवण्यात आले होते.
श्री बांदेश्वर भक्त सेवेकरी महिलांनी प्रतिवर्षाप्रमाणे भाविकांना दिवे भरुन देण्याच्या कामाचे उत्तम नियोजन केले. मंदिर परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून दिवे पेटवून या सोहळ्यात सहभाग घेतला.