*कोकण Express*
*१७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला चॅम्पियनचा बहुमान*
*सर्वोत्कृष्ट फलंदाज खारेपाटणचा चिन्मय कोळसुलकर तर सामनावीर दर्शन जोशी यांची निवड*
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे 2ते 5 डिसेंबर रोजी चौथी १७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राज्य सचिव मीनाक्षी गिरी व राज्य तांत्रिक हेड स्वप्नील ठोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. राज्यातून तब्बल मुलांचे व मुलींचे ८ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा सहभागी झाला होता. कुणाल हळदणकर व राहुल धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील खारेपाटण, कुडाळ, वैभववाडी, कासार्डे, देवगड, येथील मुले सहभागी होती. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना सिंधुदुर्ग विरुद्ध ठाणे या जिल्ह्यात झाला सामन्यात नाणेफेकीचा कौल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजुने लागला प्रथम फलंदाजी करत ५१ धावांचे लक्ष्य ठाणे जिल्ह्यासमोर ठेवले.५१ धावांचा पाठलाग करताना सिंधुदुर्गातील गोलंदाजानी बाजी मारली यात चिन्मय कोळसुलकर याने १७ चेंडुत २३ धावा बनविल्या व सर्वोत्कृष्ट फलंदाजी चा पुरस्कार मिळवला. तसेच दर्शन जोशी यांने बहुमुल्य ३ गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला.या चमकदार कामगिरीमुळे खेळाडूंनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात जास्त मुली आणि मुले खेळाडू यु. पी. येथील मथुरा येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.निवड झालेले खेळाडू राज्य सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आता राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.