हेलिकॉप्टर क्रॅश: सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले; 7 ठार, बचावकार्य सुरू

हेलिकॉप्टर क्रॅश: सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले; 7 ठार, बचावकार्य सुरू

*कोकण Express*

*हेलिकॉप्टर क्रॅश: सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले; 7 ठार, बचावकार्य सुरू*

तामिळनाडूतील नीलगिरीच्या कुन्नूर येथे बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १४ लष्करी जवानांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर आयएएफ तळावरून वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज (डीएससी) कडे जात असताना अपघात झाला.जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे देखील हेलिकॉप्टर मध्ये होते, त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आपत्कालीन आणि बचाव कार्य पथके घटनास्थळी हजर आहेत. घटनास्थळी भेट दिलेले तामिळनाडूचे वनमंत्री के रामचंद्रन यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून सात मृतदेह सापडले आहेत. यात हेलिकॉप्टर मधील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.“हेलिकॉप्टर मध्ये 14 जण होते. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित प्रवाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्याप समजू शकलेली नाही.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!