कणकवली तालुका ग्रा.पं. पोटनिवडणुक अर्ज छाननीत एक अर्ज अवैध

कणकवली तालुका ग्रा.पं. पोटनिवडणुक अर्ज छाननीत एक अर्ज अवैध

*कोकण  Express*

*कणकवली तालुका ग्रा.पं. पोटनिवडणुक अर्ज छाननीत एक अर्ज अवैध*

*नामाप्र आरक्षणाच्या ८ जागांसाठीची निवडणूक स्थगित; कासार्डे व कोळोशीतील निवडणूक प्रत्येकी १ अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

ग्रा.पं. पोटनिवडणुकीतील कणकवली तालुक्यातील छाननीमध्ये कळसुलीतील उमेदवार अक्षय मुरकर याच्या वयाची 21 वर्षे पूर्ण नसल्याने त्याचा अर्ज अवैध ठरला आहे. तालुक्यातील २३ जागांपैकी नामाप्र आरक्षणाच्या ८ जागांसाठीची निवडणूक सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर मंगळवारी स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता तालुक्यातील पाच जागांवर निवडणूक होणार आहे. तर कासार्डे व कोळोशीतील जागांसाठी प्रत्येकी १ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

कणकवली तालुक्यातील १९ ग्रा.पं.च्या २३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी यापैकी ८ जागांसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २३ जागांमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी ८ आरक्षित जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र सर्वोच्य न्यायालयाकडून सोमवारी दिलेल्या निकालानंतर या ८ जागांची निवडणूक स्थगित झाली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील कळसुली, डामरे, लोरे, हळवल व तरंदळे या ग्रा.पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!