*कोकण Express*
*देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत आज भाजपकडून ८ उमेदवारी अर्ज दाखल*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक २०२१संपन्न होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यांत प्रभाग 3 मधून रुचाली दिनेश पारकर, प्रभाग 4- रिद्धी रामदास भुजबळ, प्रभाग 7- योगेश प्रकाश चांदोस्कर, प्रभाग 8- निधी नयन पारकर, प्रभाग 9- प्रणाली मिलिंद माने, प्रभाग 10- गौतमी रमेश कदम, प्रभाग 11- अनिल विनायक कोरगावकर, प्रभाग 17- रुचा रवींद्र कोयंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, पक्ष निरीक्षक समीर नलावडे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, प्रकाश राणे, बाळ खडपे, प्रियांका साळसकर आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.