*कोकण Express*
*माजी जि. प. सदस्य रमाकांत वाळके यांचं निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माजी जिल्हा परिषद सदस्य सांगवे गावचे माजी सरपंच रमाकांत यशवंत वाळके,वय ६६ यांचे शुक्रवारी सकाळी ५. ३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झले सामाजिक कार्याची आवड असलेल्या रमाकांत वाळके यांनी सांगवे गावचे सरपंच म्हणून सात वर्षे यशस्वी धुरा वाहिली जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक विकास करून आपली छाप पाडली. काही वर्षे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम पहिले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे. दिनेश वाळके, योगेश वाळके यांचे ते वडील होत. पान व्यावसायिक हरी वाळके, कृषी केंद्राचे सुनील वाळके यांचे चुलते तर एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक दर्शन म्हाडेश्वर यांचे ते सासरे होत. त्यांंच्यावर कनेडी येथील स्मशान भूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.