*कोकण Express*
*कुडाळत भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा शिवसेनेला धक्का*
*प्रज्ञा प्रशांत राणे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ प्रज्ञा प्रशांत राणे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे गेली अनेक वर्षे त्या शिवसेनेत कार्यरत होत्या आणि मागील पाच वर्षे त्या नगरसेविका होत्या.त्यांनी आज कुडाळ शहरातील वॉर्ड क्र 14 अभिनव नगर मधून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,तालुका अध्यक्ष विनायक राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,शहराध्यक्ष राकेश कांदे,प्रशांत राणे,राजा धुरी,प्राजक्ता शिरवलकर,नयना मांजरेकर, रीना पडते,राजेश पडते,सुधीर चव्हाण,विजय सावंत,सचिन सावंत,रामू मांजरेकर,बंड्या शिरसाट,शुभम राणे,वरूनेश्वर राणे,विनोद सावंत,मनोज सावंत आधी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते