*कोकण Express*
*मळेवाड-भटवाडी येथील रखडलेल्या पुलाच्या कामाची पहाणी करून संबंधित ठेकेदाराला सूचना*
*माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर*
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मळेवाड भटवाडी ते शिरसाटवाडी येथील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा, अशा सूचना माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या. श्री केसरकर यांनी त्या पुलाच्या कामाची जाऊन पाहणी केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा सेना तालुका अधिकारी योगेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, प्रकाश पार्सेकर,भाई रेडकर,सुनील तिरोडकर आदी उपस्थित होते.
मळेवाड भटवाडी ते शिरसाट वाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याचे व पुलाचे काम मंजूर झाले आहे,मात्र हे काम सध्या अर्धवट स्थितीत असून कामाचा कालावधी होऊन सुद्धा सदरील काम अपूर्णावस्थेत आहे.मात्र या कडे संबंधित खाते,ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने याचा त्रास येथील ग्रामस्थ,पादचारी,वाहन चालकांना बसत आहे.वेळोवेळी सदरील कामाबाबत आवाज उठऊनही याची दखल घेतली जात नसल्याने,सदरील बाब माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना प्रकाश पार्सेकर यांनी निदर्शनास आणून दिली.आमदार केसरकर यांनी याची दखल घेत सदरील अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.