व्यापाऱ्यांनी नोंदणी, परवान्यांचे नूतनीकरण करावे

व्यापाऱ्यांनी नोंदणी, परवान्यांचे नूतनीकरण करावे

*कोकण  Express*

*व्यापाऱ्यांनी नोंदणी, परवान्यांचे नूतनीकरण करावे…!*

*जिल्हा व कणकवली व्यापारी संघाचे आवाहन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली बाजारपेठेतील सर्व किरणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी, भुसारी दुकान, कोल्ड्रींक्स, व्यापारी, पान स्टॉल, स्टॉलधारक, घरगुती खानावळ, मत्स्य विक्रेते, मांस व मटन विक्रेते, खाद्य पदार्थ उत्पादकचे विक्रेते व फिरते विक्रेते, आईस्क्रिम विक्रेते यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची नोंदणी व परवान्यांचे नूतनीकरण एक महिना अगोदर करावे. तसे न केल्यास प्रतिनिधी 100 रु. दंड भरावा लागणार आहे. नोंदणी व परवान्यांच्या नूतनीकरणासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने बुधवार दि. 8 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 यावेळेत ही प्रक्रिया बेलवलकर ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या कांबळी गल्ली येथे राबविण्यात येणार आहे. तरी संबंधित सर्व व्यापार्‍यांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन नोंदणी व परवान्यांची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यापारी संघ व कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!