*कोकण Express*
*निवडणुकीच्या तोंडावर देवगडात भाजपला धक्का*
*देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील तरवाडी पिरवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत तरवाडी पिरवाडी येथील सुमारे 70 हून अधिक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने आमदार नितेश राणे यांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी मोठ्या संख्येने तरवाडी पिरवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, रवींद्र जोगल आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे यांनी देखील प्रवेश करत भाजपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमध्ये हायमॅक्स वगळता एकही विकास काम झाले नसून त्यांनी स्वतःचा विकास केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
नगरपंचायत मध्ये रिया शेडगे यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून देण्यात आली होती परंतु आयत्या वेळी उमेदवारी नाकारून भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेली टीका योग्य नसल्याची खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. या मूळ भाजपच्या कट्टर कार्यकर्ता असल्याचे देखील बोलले जात आहे.