*कोकण Express*
*तुळस ग्रामपंचायत सरपंच शंकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ट्रान्सफॉर्मर मागणीसाठी तुळस येथील जकातनाका खरीवाडा, चुडजीवाडी, सावंतवाडा, राऊळवाडा येथील ग्रामस्थ एकवटले*
*26 जानेवारी पूर्वी ट्रान्सफॉर्मर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण बसण्याचा इशारा*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
तुळस गावातील वरील वाडीतील एकत्रित ट्रान्सफॉर्मर असून ह्या ट्रान्सफॉर्मर वर पंधरा-वीस शेती पंप ग्रामपंचायत पाणीपुरवठा पंप छोटे-मोठे व्यवसाय,घरगुती घरघंटी घरातील विद्युत पंप वारंवार खंडित होणे, जळणे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होणे अशा प्रकारांना सामना स्थानिकांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागत आहे.
वेळच्या वेळी निवेदन दिलेली आहेत. तसेच 2018 ला तुळस ग्रामपंचायत कडून परिपूर्ण प्रस्ताव वेंगुर्ला तालुका कडे पाठवला असून तो पुढे पाठविल्याचे कळते परंतु जिल्हा कडून निधी मिळत नसल्यामुळे तो अपूर्ण आहे तरी लवकरात लवकर निधी मिळवून देऊन नवीन ट्रान्सफॉर्मर करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांसह 26 जानेवारी 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत, असे तुळस सरपंच शंकर घारे यांनी सांगितले.
यासोबत वरील वाडीतील 76 ग्रामस्थांनी सह्या केलेले पाठिंबा निवेदन म्हणून सोबत जोडण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी ओरोस सिंधुदुर्ग, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. मं. वेंगुर्ला,मा. अधीक्षक अभियंता कुडाळ, मा. पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा,आमदार सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघ, खासदार सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा, मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा, आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग, अध्यक्ष- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग ह्या सर्वांना ट्रान्सफॉर्मर मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणास बसणार त्याबाबत निवेदन दिलेले आहे.