*कोकण Express*
*मुंबई-गोवा हायवे ब्लॉक; साळीस्ते बौद्धवाडी येथे ग्रामस्थांनी केले रास्ता-रोको आंदोलन*
*मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा*
साळीस्ते बौद्ध विकास मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या साळीस्ते बौद्धवाडी येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 लगत साळीस्ते बौद्धवाडी हे शासनमान्य बस स्थानक आहे, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करताना सदर बसस्थानक संबंधित ठेकेदाराने तोडले व स्थानिक लोकांना सांगितले की चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर शासनाच्या नियमानुसार बसस्थानक बांधून देण्यात येईल असे आश्वासन दिले.आहे असे निवेदनात ग्रामस्थांनी म्हंटले आहे. गावात दोन बसथांबे असताना त्यातील एक बसथांबा ठेकेदार व्यवस्थितपणे बांधून देतो मात्र एकूण हायवे संलग्न असणाऱ्या पाच वाडी साठी अत्यावश्यक असणारा बौद्धवाडी एसटी बसथांबा पुनर्बांधणी का करू शकत नाही असा सवाल रास्ता-रोको करणाऱ्या साळीस्ते गावच्या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, येत्या 15 दिवसात बसथांबा न बांधल्यास रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा साळीस्ते बौद्ध विकास मंडळ, ग्रामस्थ साळीस्ते यांच्यावतीने देण्यात आला आहे.