*कोकण Express*
*कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ*
*दर्शनासाठी भाविभक्तजनांची गर्दी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला सोमवारी कणकवली येथील आश्रमात प्रारंभ झाला. भाविकांच्या उपस्थितीत पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी पहाटे ५.३० वाजता समाधी पूजन तसेच काकड आरती झाली. सकाळी ८ वाजता सर्व भक्त कल्याणार्थ यागाला प्रारंभ झाला. त्यानंतर परमहंस भालचंद्र महाराज रुद्राभिषेक अनुष्ठान व दुपारी १२.३०वाजता आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना तिर्थप्रसाद व खिचडीप्रसाद वाटप करण्यात आले.
दुपारी १ वाजल्यानंतर विविध भजनी बुवांनी आपली कला श्रींच्या चरणी सादर केली. सायंकाळी ४ वाजल्यानंतर कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. तर रात्री ८ वाजता आश्रमातील दैनंदिन आरती झाली. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते.