*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ३४ उमेदवारी अर्ज दाखल…*
*दाखल उमेदवारी अर्जांची उद्या होणार छाननी*
*६ ग्रामपंचायत सदस्य होणार बिनविरोध…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील १९ ग्रामपंचायत मधील २३ सदस्य पोटनिवडणुकांसाठी एकूण ३४ अर्ज उमेदवारांनी दाखल झाले आहेत. त्यामध्ये ८ जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तर करंजे, डामरे, कासार्डे, कोळोशी, कुरंगवणे, शेर्पे या ग्रामपंचायत मधील एका प्रभागात प्रत्येकी १ प्रमाणे ६ जागांवर केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. तसेच ९ जागांसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकुण दाखल ३४ अर्ज दाखल झाले आहेत, अर्जांवर उद्या (७ डिसेंबर)छाननी होणार आहे.
माईण – प्रभाग ३ – नागरिकांचा मागास प्रवर्ग – आनंद बिर्जे, मिलिंद बिर्जे, करंजे – प्रभाग २ – ना.मा.प्र. – विकाश शिरसाट, कळसुली – प्रभाग ४ – सर्वसाधारण स्त्री (२ जागा) राधिका वारंग, प्रगती भोगले, मानसी शिर्के, (ना.मा.प्र)- प्रसाद कानडे, बाबजी मुरकर, अक्षय मुरकर, डामरे – प्रभाग २ – सर्वसाधारण स्त्री – पुजा कानडे, विनिता सावंत, तर ना.मा.प्र. पुजा कानडे हा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
लोरे – प्रभाग ३ – सर्वसाधारण – काशिराम नवले, विठ्ठल मांडवकर, वैभव देवलकर, संदीप नराम, हळवल – प्रभाग १ सर्वसाधारण – सुदर्शन राणे , विक्रम राणे , नामदेव राणे, जगदीश राणे, कासार्डे – प्रभाग २ – सर्वसाधारण – अवधूत शेटये, कोळोशी – प्रभाग २- सर्वसाधारण – नीता पावसकर, जानवली – प्रभाग ३ – ना.मा.प्र. – राजेश शेटये, संतोष कारेकर, संजना कारेकर, दिलीप हिर्लेकर, हरकूळ बुद्रुक – प्रभाग ४ – सुहास पावसकर, नित्यानंद चिंदरकर, तरंदळे – प्रभाग १ – सर्वसाधारण – रमाकांत देऊलकर, अमोल परब, संजय परब, आनंद डोईफोडे, कुरंगवणे – प्रभाग १ – ना.मा.प्र. – रविंद्र कुडाळकर, शेर्प – प्रभाग २ – ना.मा.प्रमुख परशुराम बेळणेकर आदी उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
त्यामुळे कणकवली तालुक्यातील लढत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये राजकीय वातावरण तापणार आहे.माईन येथील शिवसेना पुरस्कृत उमेदवार मिलिंद भास्कर बिर्जे यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,भालचंद्र दळवी,बाबू घाडी,दादा भोगले आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.