*कोकण Express*
*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पोलीस कैलास इंफाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक ०६/१२/२०२१ रोजी जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री बगाटे साहेब यांच्या उपस्थितीत, तसेच कणकवली तालुका पोलीस निरीक्षक श्री हुंदळेकर साहेब यांच्या उपस्थितीत पो.कैलास इंफाळ यांचे अभिनंदन केले.
आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील काकडे हॉटेल मध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटर ला आग लागून होणारा अनर्थ टळला. आणि म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यावेळी सोबत कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर, प्रदिप कुमार जाधव, संदीप कदम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.