*कोकण Express*
*_कलमठ ते झाराप महामार्गाच्या लोकार्पणास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित….*
*जिह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार ही काळ्या दगडावरची रेघ…_*
*खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती_*
*सिंधुदुर्गनगरी दि.०६-:*
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असून सिंधुदुर्गनगरी किंवा झाराप येथे वैद्यकीय महाविद्यालय होणार यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून तो लवकरच केंद्र शासनाला सादर केला जाईल तसेच मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणातील सिंधुदुर्ग हद्दीतील कलमठ ते झारापपर्यंतचे काम जानेवारी पर्यंत पूर्णत्वास जाणार असून जानेवारीत या महामार्गाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दिशा समितीच्या बैठकीनंतर खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपस्थित होते. यावेळी खा.राऊत यानी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत आणि येत आहेत कोरोनाचा काही प्रमाणात त्याला अडसर झाला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या सर्व योजना राबविल्या जातील ग्रामीण व शहरी भागातील 40 हून अधिक योजना असून त्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजना तसेच विविध रोजगाराच्या दृष्टीने अनेक योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कृषी पंपांना वीज कनेक्शन , घरगुती वीज कनेक्शन त्याचा बॅकलाँग येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून 100% घरगुती इलेक्ट्रिशियन काम पूर्ण होणार असल्याचे सांगून केंद्र शासनाच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत एक लाख 18 हजार 506 कुटुंबांना पाणी देण्यात येणार आहे जिल्ह्यात शंभर टक्के प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बेघर कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देताना ज्या लाभार्थींकडे जमीन नाही अशा लाभार्थींसाठी आता 50 हजारऐवजी 60 हजार रुपये जम