*कोकण Express*
*_जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले….._*
*खासदार विनायक राऊत._*
*सिंधुदुर्गनगरी दि.०६-:*
जिल्ह्यामध्ये रस्त्यांचा दर्जा सुधारल्यामुळे व महामार्गाचे काम पूर्णत्वास आल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकरी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, जानेवारी 2020 ते ऑक्टोबर 2020 कालावधीत जिल्ह्यात 112 अपघात झाले असून एकुण 38 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्के इतके आहे. तथापी जिल्ह्यात अपघाताने कोणाचाही प्राण जावू नये यासाठी उपाय योजना करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. याव्दारे जिल्ह्यात वाहतूकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात सुरक्षित वाहन चालवण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यामध्ये ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा. जिल्ह्यातील महामार्गावर दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावे. रात्रीच्या वेळी वळण रस्ते यांची माहिती देणारे फलक दृष्टीस पडतील अशा पध्दतीने लावण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित वाहन चालविण्याबाबतची माहिती पत्रके लावण्यात यावीत. असे आदेश देवून सांगून खासदार श्री. राऊत पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये वाहतूक पोलीस व परिवहन विभागाने चूकीच्या पध्दतीने वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी. अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.