*कोकण Express*
*राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थिती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर, प्रदीप कुमार जाधव, संदीप कदम तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.