एसटी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे षड्यंत्र – अनंत रावले

एसटी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे षड्यंत्र – अनंत रावले

*कोकण Express*

*एसटी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे षड्यंत्र – अनंत रावले*

*तर प्रशासन हे हिटलर शाहीच्या भूमिकेत…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

एसटी प्रशासनाने आजपर्यंत साम-दाम-दंड-भेद सगळ्या प्रकारचे कर्मचार्‍यांना त्रास देऊन दुखवटा मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज या घडीला शांततेच्या मार्गाने चालत असलेला हा दुखवटा कुठेतरी आपल्या मनमानी कारभारासाठी दुजाभाव करून कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम होत आहे, असा आरोप अनंत रावले यांच्यासह अन्य संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

या बाबत म्हटले आहे, प्रशासन हे हिटलर शाहीच्या भूमिकेत दिसत आहे. किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त त्रास देण्याचा विडा उचलला सारखा दिसत आहे. पोलिस यंत्रणेकडे तक्रार करून त्यामध्ये असलेल्या कर्मचार्‍यांचा मंडप काढणे, आगारामध्ये मज्जाव करणे अशा अनेक प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विभागांमध्ये एवढे कार्यक्षम अधिकारी असताना विभागीय भांडार अधिकारी हे चालक, वाहक, टी टी एस लोकांच्या मार्ग बंद वर सही करत आहेत. ही खूप अशोभनीय गोष्ट आहे. त्याचप्रमाणे फक्त कारवाईसाठी काही अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आलेल्या आहेत. ज्या वेळेला आगाराला त्यांची गरज होती त्या वेळेला त्यांची बदली करण्यात आली नाही. जे कर्मचारी आज दुखवटा मध्ये आहेत आज न उद्या कामावर येणार आहेत. आणि हे कामगारांना पूर्ण वेळ काम करणार आहेत. याची अधिकार्‍यांनी जाण ठेवायला हवी. कामगार विभागाची संघटना विरहित एकजूट एवढी भक्कम आहे. एकीचे बळ काय असते दाखवून दिलेले आहे असे अनंत रावले, अविनाश दळवी, तुषार कदम, शरद परब, अनिकेत इंदप, कल्पेश कांबळे यांनी सांगितले. यावेळी विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील 53 एसटी कर्मचार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!