*कोकण Express*
*कुडाळ शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आज कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील सौ, मनिषा सावंत यांच्यासह अनेक अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश जिल्हाध्यक्ष मा, अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला, त्यांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत करताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या बरोबर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, प्रदेश अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इनामदार, सचिव मुजावर,काका कुडाळकर, भास्कर परब, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, उपाध्यक्ष सुनील भोगटे,नझीर शेख,साबा पाटकर, इब्राहिम शहा,सुरज खान,शफीक खान सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते,
नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत सौ, मनिषा सावंत यांच्या सह त्यांच्या सोबत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे कुडाळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत होईल,तसेच येत्या नगरपंचायत निवडणुकीत याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त करुन प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले.