*कोकण Express*
*सोनावल ते पाळये रस्ता ठरतो वाहतुकीस धोकादायक*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सोनावल ते पाळये रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर होवून संबंधित ठेकेदाराने हा रस्ता अर्धवट काम करुन ठेवला आहे. त्यामुळे तो वाहतुकीस धोकादायक असुन त्याचे काम पुर्ण करण्यात यावे.हे काम येत्या आठ दीवसात पुर्ण न झाल्यास संबंधित कार्यालयाला घेरावो घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांनी दीला आहे. अशा आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय कुडाळ यांना दिले असुन त्यांना आठ दीवसाची मुदत देण्यात आली आहे.