*कोकण Express*
*राष्ट्रवादीला धक्का राजू धारपवारांसह चौघांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश…*
जिल्हा युवक राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत कुरबुरीला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे. त्या ठिकाणी असलेले सावंतवाडीचे युवकचे तालुकाध्यक्ष राजू धारपवार आणि तालुका चिटणीस अस्लम खतिब यांच्यासह अन्य दोघांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला.
यावेळी नवीन गावकर, असिम वागळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रवेश करणार्या संबधित पदाधिकार्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे श्री. गावडे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष राघू नार्वेकर, समिर वंजारी आदी उपस्थित होते.