*कोकण Express*
*वैभववाडी : खांबाळेत १४ डिसेंबरला निमत्रिंताची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा*
खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदीरातील हरिनाम सप्ताहानिमित्त १४ डिसेंबरला निमत्रिंत बुवांची जिल्हास्तरीय भजनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदीरात येत्या १४ डिसेंबरला हरिनाम सप्ताह आहे. या सप्ताहनिमित्त जिल्हयातील निमत्रिंत बुवांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला दुपारी तीन वाजता सुरूवात होणार आहे.
या स्पर्धेत सांघिक बक्षिसांसह वैयक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक- ११ हजार १११ व चषक, द्वितीय क्रमांक- ७ हजार ७७७ रूपये व चषक, तृतीय क्रमांक-५ हजार ५५५ व चषक, याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे असुन तीन भजनीमंडळांना प्रत्येक २ हजार २२२ व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट झांजवादक, उत्कृष्ट कोरस अशी बक्षिसे असुन प्रत्येकी १ हजार १११ व चषक देण्यात येणार आहेत. या भजन स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण विविध सोशल मिडीयाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. जिल्हयात लोकप्रिय आणि नावलौकीक असलेल्या निवडक भजनी मंडळे आणि बुवांना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे. या स्पर्धेचा भजनश्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी आदिष्टी देवस्थान उपसमितीच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.

