*कोकण Express*
*दोडामार्ग तालुका उपसंघटकपदी विजय जाधव यांची निवड*
दोडामार्ग येथे शनिवारी पार पडलेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीत शिवसेना दोडामार्ग तालुका उपसंघटकपदी शिवसेना माजी विभागप्रमुख विजय जाधव यांची नियुक्ती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी जाहिर करुन तसे नियुक्ती पत्र देण्यात आले.
मणेरी शिवसेना विभागप्रमुख विजय जाधव यांनी कुडासे ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान आपल्या पदाचा त्याग केला होता.पण शिवसेना पक्षाचे काम सुरू ठेवले होते.
शनिवारी दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक संदर्भात बैठक पार पडली यावेळी विजय जाधव उपतालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली.