*कोकण Express*
*सिंधुदुर्ग मधील आगामी सर्व निवडणुकीत भाजपचाच गुलाल उधळला जाईल, भाजपचेच फटाके फुटतील*
*भाजप नेते निलेश राणे यांचा हल्लाबोल ; मालवण येथील बैठकीत चौफेर फटकेबाजी*
*मालवण ः प्रतिनिधी*
वैभव नाईक हा नगरसेवक कॅटेगीरी माणूस. केवळ निधी मंजुर झाला ह्या अफवा पसरवणे हे वैभव नाईक यांचे काम. प्रत्यक्षात काम काहीच नाही. काँग्रेसची औलाद असलेल्या वैभव नाईकने २०१९ विधानसभा निवडणुकीत सतीश सावंत यांच्या चाली आम्हाला सांगितल्या. असा थेट हल्लाबोल भाजप नेते प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी मालवण केला.
जनतेला आता राज्यात आणि जिल्ह्यातही शिवसेना नकोच आहे. सिंधुदुर्ग मधील आगामी सर्व निवडणुकीत भाजपचाच गुलाल उधळला जाईल, भाजपचेच फटाके फुटतील. असा विश्वासही निलेश राणे यांनी व्यक्त केला. २०२४ च्या निवडणुकीनंतर वैभव नाईक आमदार म्हणूनही दिसणार नाही. विनायक राऊत तर निवडणुकच लढवणार नाही. असेही निलेश राणे यांनी ठामपणे सांगितले.
आगामी जिल्हा बँक व नगरपरिषद निवडणुक पार्श्वभूमीवर मालवण शहर व परिसरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजप कार्यालयात पार पडली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा चिटणीस विजू केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक जगदिश गावकर, नगरसेविका पूजा करलकर, नगरसेविका ममता वराडकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बाळू कुबल, आबा हडकर, अजय शिंदे, राजू बिडये, चारूशीला आचरेकर यासह अन्य उपस्थित.
राणे साहेबांच्या माध्यमातून मालवण शहर प्रगतीपथावर व विकासाच्या वाटेवर स्वार असताना शिवसेनेने पाच वर्षात मालवण शहर बकाल केले. शहर बेचिराख काम करण्याचे काम शिवसेना नगराध्यक्ष व टीम करत आहे. आमदार वैभव नाईक शहारात भूमिपूजन करतात ती कामेच पुढे पूर्ण होत नाही. कामे अर्धवट राहणे हे नित्यनियमाचे झाले आहे. असे सांगत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शिवसेनेवर तोफ डागली.
आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष नियुक्ती झालेल्या ललित चव्हाण यांचेही आचरेकर यांनी विशेष कौतुक केले.
मालवण पालिकेत भाजपचा विजय निश्चित जिल्ह्याचा कोकणचा विकास राणे साहेबांच्या माध्यमातून झाला. राणे साहेब ही आमची ओळख आहे. मात्र मालवण आणि राणे साहेबांचे वेगळे नाते आहे. साहेबांच्या वाटचालीत येथील अनेक जेष्ठ कार्यकर्ते यांचे मोठे योगदान आहे. याच पदाधिकारी यांनी पक्षाला यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आता मालवण शहारात सुदेश आचरेकर, दीपक पाटकर व टीम चांगले काम करत आहे. आगामी पालिका निवडणुकीत भाजपला शंभर टक्के यश मिळणारच. असाही विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.