आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

*कोकण Express*

*आंबोली घाटातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा*

*मनसेची मागणी;पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आंबोली घाटातून सध्या पुन्हा बेकायदेशीरपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून पोलिसांकडून ही वाहने सोडली जात आहेत. यामागे गुपित काय? असा सवाल उपस्थित करून पुढील धोका ओळखून ही वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाटातून अवजड वाहनांची वाहतूक रात्रीच्या वेळेस होते. नेमके रात्रीस खेळ चाले खेळ आंबोली घाटात कोणाच्या आशीर्वादाने होतात? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्याभरात या घाटात दोन अवजड वाहतूक करणाऱ्या कंटेनर तसेच डंपरच्या वाहनांना अपघात झाला असून याला जबाबदार कोण? त्याचप्रमाणे प्रशासनाने ही बाब गंभीर घ्यावी अन्यथा भविष्यात बेळगाव कोल्हापूरकडे जाणारा मार्ग बंद होण्याची शक्यता. गेली दोन वर्षे आंबोली घाटातील सुरक्षेच्या कारणास्तव होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

आंबोली घाटातील दरडी सातत्याने कोसळत असल्यामुळे तसेच घाट रस्ता खचत असल्यामुळे अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोना महामारी टाळेबंदी कालावधीत देखील घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आंबोली येथे पोलीस दुरक्षेत्र तसेच तपासणी नाका असून या नाक्यावरून पोलिसांकडून रात्री उशिरा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बेकायदेशीर पणे सोडले जात आहे. गेल्या आठवड्याभरात सलग दोन मोठ्या वाहनांना घाटात अपघात झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही तरी ही वाहने सोडण्यामागे पोलिसांचा नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाटाच्या सुरक्षेच्या कारणावरून हे निर्बंध घातले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून काटेकोर पणे करणे आवश्यक आहे. अशा वाहनांवर दंड आकारण्यात येऊन त्यांना वाहतूक करण्यास बंदी घालणे आवश्यक आहे तरी आंबोली घाटातूंन होणारी अवजड वाहतूक रोखण्यात यावी प्रसंगी अशा वाहनांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. ही वाहने कोणाच्या दबावाखातर सोडली जात असल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जावी त्याचप्रमाणे सदर आंबोली घाटात होणारी अवजड वाहतूक आपल्यामार्फत त्वरित थांबवावी अन्यथा येथील मनसेचे कार्यकर्ते स्वतः त्या ठिकाणी पहारा देऊन हे रात्रीस खेळ चालेचे खेळ लवकरच जनतेसमोर उघडकीस आणतील, असा इशाराही दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर अभय देसाई गोविंद मोरये तानाजी मेस्त्री मंगेश वरक सुमेध सावंत आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!